अल्पवयीन, शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना खुलेपणाने रुम्स उपलब्ध ?
रुम्स उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्स, लॉजिंग वर कठोर कारवाईची मागणी..
हिंदू जनसंपर्क कार्यालयाची DCP किरणकुमार चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
दक्ष न्युज : प्रतिनिधी
नाशिक: मुंबई आग्रा हायवेवर, भुजबळ फार्म लगत असलेल्या रॉयल इन हॉटेल च्या रूममध्ये एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तीच्या मारहाणीचा व्हिडिओ एका मुलाने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंट वरून व्हायरल केला. काही सुज्ञ युवकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळवली. आणि क्षणाचाही विलंब न करता या अल्पवयीन मुलीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवत मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही तात्काळ त्या नराधमाला अटक केली आणि अंबड पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सद्य स्थितीत नाशिक शहरात असंख्य लॉजींग, हॉटेल्समध्ये शालेय, महाविद्यालयीन युवक-युवतींना खुलेपणाने रूम्स उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे हिंदुस्थानची उगवती पिढी वाममार्गाला जाऊन अक्षरशः असंख्य मुलींचे आयुष्य बर्बाद होऊन संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. म्हणून आज हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या च्या वतीने काल घडलेल्या घटनेतील हॉटेल रॉयल इन सह शहरातील सर्व बेकायदेशीर पणाने मुलामुलींना सहज रूम उपलब्ध करून देणाऱ्या सर्व हॉटेल्स, लॉजवर वर कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख, नाना दंडगव्हाळ, पंकज भिंगारे, राजेंद्र चव्हाण, प्रसाद कोलते, सचिन शिकारे, धिरज जोशी, राहुल मोराडे, विलास सनानसे, हर्षल फुलदेवरे, सचिन जोंधळे, राहुल सुर्यवंशी, जयवंत पवार, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.