श्री क्षेत्र वडसिंग नागनाथ महाराज मंदिर गंगावे विटावे येथे होणार भव्य राष्ट्रीय धार्मिक महोत्सव..


नाशिकमध्ये पत्रकार परिषद संपन्न..

नाशिक: नाथ संप्रदायाचे सिद्ध विभुती असलेले नवनाथांपैकी एक वडसिंग नागनाथ महाराज यांच्या पावनभूमीत श्री क्षेत्र गंगावे विटावे ता.चांदवड नाशिक येथे दि. ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ रोजी भव्य दिव्य स्वरूपात विविध धार्मिक सोहळे पार पडणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे महंत श्री श्री १००८ श्री गणेशानंद महाराज सरस्वती , पंचवटी येथील ह.भ.प. माधवदास महाराज राठी , डॉ. प्रकाश कोल्हे यांनी जाहीर केले.

राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या वडसिंग नागनाथ मंदिरावर ११ ऑगस्ट २४ रोजी साधु महंताच्या उपस्थितीत १०८ कलशारोहन कार्यक्रम , साधु महंत यांची भव्य मिरवणुक , ब्रम्हांडीय ऊर्जा एकवटणारी शंखनाद करणाऱ्या १०१ लोकांचा समुह आपला कलाविष्कार दाखवणार आहेत. सात दिवस सलग १०८ कुंडी अतिरुद्र यज्ञ सोहळा तसेच सातही दिवस रोज सायंकाळी किर्तन होणार आहेत. शैव – वैष्णव यांचा कुंभमेळा च भरणार असल्याने ” न भूतो न भविष्यते ” असा आगळा वेगळा धार्मिक महोत्सव नाशिक जिल्ह्यात होत असून या कार्यक्रमाला येतांना कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाहीत अशी व्यवस्था नियोजन समितीने परिपूर्ण केली असून त्याचा भाविक भक्तांनी लाभ मिळवावा असे आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

श्री क्षेत्र गंगावे विटावे येथे होत असलेल्या वडसिंग नागनाथ महाराजांच्या धार्मिक सोहळ्यात आयोजकांनी पुढाकार घेऊन हे कर्तव्य पार पाडत आहेत ते भूषणावह असून अशी ईश्वरीय देणं असलेल्याच हे परमभाग्य प्राप्त होत. शैव वैष्णव यांचा मेळावा भरणार असल्याने सर्वांचा यात हातभार लागणार आहेत. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्री श्री १००८ महंत गणेशानंद सरस्वती यांचे कडे असल्याने हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहेत त्यामुळे परिसरातील भाविकांनी शक्य तेवढी सेवा करावीत. आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
-ह.भ.प. माधवदास महाराज राठी
पंचवटी नाशिक

साधु संतांच्या आशिर्वादाने आणि कोल्हे सरांच्या संकल्पनेतून या धार्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून देशभरात या कार्याचे स्मरण राहील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहेत. नाथांचे मुळ हे शिव आहेत. म्हणून ब्रम्ह, विष्णु ,महेश यांचे प्रतिक म्हणून जगातील सर्वात ऊंच त्रिशुळाचे निर्माण कार्य श्री क्षेत्र गंगावे विटावे या ठिकाणी होणार आहेत.मार्गदर्शन केल्या प्रमाणे नियोजन समिती अहोरात्र परिश्रम घेत असून आपणही या कार्यक्रमास येऊन शोभा वाढवावी.
-श्री श्री १००८ महंत गणेशानंदजी सरस्वती , त्र्यंबकेश्वर

येत्या ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या वैश्विक धार्मिक सप्ताहात सबंध भारतभरातून साधु महंत आणि संत मंडळी येणार असल्याने हा आनंद आम्हा सर्वांसाठी स्वर्गाहुन काही वेगळा नाहीत. संकल्पीत कार्यक्रमास सर्वांनी मनोभावे यावे सेवाभावी वृत्तीने सहकार्य करावे नियोजन समिती योग्य प्रकारे काम करत असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहेत.
-डॉ. प्रकाश कोल्हे सर (दादा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *