देवळा तालुक्यातील दहिवड येथे शिवलीला अमृत ग्रंथ वाचन व किर्तन सोहळा सप्ताह सुरू..
दक्ष न्युज प्रतिनिधी : आदिनाथ ठाकूर
देवळा: गेल्या अठरा वर्षापासून दागड्या डोंगर येथे अखंड हरिनाम सप्ताह च्या निमित्ताने शिवलीला अमृत ग्रंथ पारायण व हरिपाठ व किर्तन सोहळा यांचे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन ठेवण्यात आलेली आहेत.

हा पाच दिवसाचा सप्ताह असून या ठिकाणी रोज सकाळी काकड आरती व नऊ ते बारा शिवलीला अमृत ग्रंथ वाचन व पाच वाजेपासून पुढे हरिपाठ सायंकाळी सात वाजता महाप्रसाद होतो व रात्री रोज नऊ ते अकरा मान्यवर कीर्तनकारांची कीर्तन होतात गेल्या अठरा वर्षांपासून हा सप्ताह होत आहे. येथील अध्यात्मिक क्षेत्रात तरुण युवकांचे मोठे योगदान असते.