ललितकुमार नहार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नाशिक: शुभम आहिरे

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा शहर प्रमुख ललितकुमार नहार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आलं होतं या शिबीरा प्रसंगी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. ब्रिच कॅन्डी रुग्णालयातील नामांकित डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बी एस एल, शुगर, ई सी जी, डोळे, पुर्व कोविड तपासणी तसेच स्त्री रोग मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबीर सेठी प्लाझा, ब्रिच कॅन्डी हाॅस्पीटल, गडकरी चौक या ठिकाणी संपन्न झाले.

त्याचवेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा शहर प्रमुख ललितकुमार नहार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. त्यानंतर आमदार सीमा हिरे व महेश हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक सतीश सोनवणे व प्रशांत जाधव, आशिष नहार, फइम शेख यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी हार शाल पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा जैन उत्तर महाराष्ट्र प्रमुख मुकेशजी जैन यांनी केले होते. या प्रसंगी अनिलजी नहार, दिलीपजी टाकिया, किशोर बाफना, राजेंद्र कुमट, मोहित काटीया, कुणाल पारक, राजेंद्र जालोरी, मनीष नहार, चिराग मेहता आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर भंडारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *