नाशिकमधील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांच्या अर्ज स्वीकारायला सुरुवात..
दक्ष न्युज: प्रतिनिधी
नाशिक: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार नाशिक शहरातील चारही विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पूर्व विधानसभा मतदार संघासाठी संदीप ब्रिजलाल शर्मा तसेच मध्य विधानसभा मतदारसंघासाठी हनिफ बशीर, आजिनाथ नागरगोजे, भालचंद्र पाटील पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी माया काळे देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी किरण जाधव यांनी अर्ज घेतले.

दिनांक १० जुलै रोजी काँग्रेस भवन येथे देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी सर्वप्रथम किरण जाधव यांनी आपला अर्ज नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्जाची विचार न करता काँग्रेस भवन येथे गर्दी केली होती.
याप्रसंगी शहर अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष हनीफ बशीर, ज्येष्ठ उपाध्यक्ष संदीप शर्मा, नाशिक जिल्हा एन एस यू आय चे नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अल्तमश शेख, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव पानगव्हाणे, भालचंद्र पाटील, आजिनाथ नागरगोजे, संतोष ठाकूर, सातपूर महिला काँग्रेसचे अध्यक्ष माया काळे, गौरव सोनार, फारुख मन्सुरी, शहबाज मिर्झा, इसाक कुरेशी, देवळाली विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.