टोकियो ऑलिम्पिकसाठी नाशिकचे अशोक दुधारे यांची भारतीय निरीक्षकपदी निवड

नाशिक: करणसिंग बावरी

भारतीय तलवारबाजी (fencing) संघटनेचे कोषाध्यक्ष, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य, शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक अशोक दुधारे यांची उत्तर महाराष्ट्रातून टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतातर्फे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली.

India has been selected as an observer for the upcoming Olympics in Tokyo

दुधारे यांच्या निवडीमुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचाआनंद खरे, राजू शिंदे, अविनाश ढोली, उदय खरे, शशांक वझे यांनी ऑलिम्पिक बोधचिन्ह देऊन सन्मान केला. गुरुवारी रात्रीच अशोक दुधारे हे जपानमध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंच्या चम्मूमध्ये जाऊन पोहोचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *