गोवंश जातीचे जनावरे व 200 किलो गोमांस जप्त! इंदिरानगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी..


दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नाशिक: शहरामध्ये गोवंश तस्कर आणि गोमांश विक्रीचे प्रमाण दिवसान दिवस वाढत चालले आहे. दररोज एक तरी गोवंश तस्कर किंवा गोवंश विक्रीची घटना समोर येत असल्याने नागरिक हैराण आहेत. याच पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इंदिरानगर परिसरातील वडाळा गाव येथे मेहबूब नगर मध्ये इंदिरानगर पोलिसांनी धाड टाकून गोवंश हत्या होणाऱ्या चार गाई आणि 200 किलो मास ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदिरानगर परिसरातील वडाळा गाव येथील मेहबूब नगर मध्ये गोवंश असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने छापा टाकून पोलीस पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

सदरची कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक पीएसआय भूषण सोनार, पोलीस शिपाई सागर परदेशी, पोलीस शिपाई जावेद खान यांच्यासह पथकाने केली आहे.

इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून यापुढेही पथकाने अशीच कारवाई सुरू ठेवावी अशी आशा नागरिक व्यक्त करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *