श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागाच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

नाशिक: दक्ष प्रतिनिधी

पुरग्रस्त कोकणवासीयांना एक छोट्याशा मदतीचा हात देण्याचं आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभागाच्या वतीने नाशिककरांना करण्यात आलं होतं. सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत नाशिककरांनी या आव्हानाला उदंड प्रतिसाद दिला. जमलेल्या सर्व मदतीची योग्य विभागणी करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे धारकरी आज कोकण च्या दिशेने रवाना झाले. अन्न, वस्त्र या मुलभूत गरजा लक्षात घेऊन साधारण ३४५ किट तयार करण्यात आले.

एका किट मध्ये ५ किलो तांदूळ, ३ किलो आटा, २ किलो बाजरीचे पीठ, १ किलो साखर, तुरडाळ मुगडाळ प्रत्येकी एक १ किलो, मीठ १ किलो, दोन लिटर तेल, बिस्किटे, हळद, मिरची पावडर, लसुण पेस्ट, फरसाण, ३ पाणी बॉटल्स, एक साबण, कोलगेट, लहान मुलांसाठी नवीन रेनकोट, एक नवीन ब्लॅंकेट, आणि महिलांसाठी सॅनिटरी पॅड, एक साडी व अंतर वस्त्रे असल्याची माहिती प्रतिष्ठानचे इंदिरानगरचे प्रमुख श्री. सागर देशमुख यांनी दिली.

मदत रथाचे पुजन योगी श्री. अश्विननाथजी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. बाळासाहेब पाठक, श्री. अजयजी बागुल यांच्या सह असंख्य धारकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *