विहिरीत तोल जाऊन १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
दक्ष न्यूज प्रतिनिधी: संतोष विधाते
दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील 17 नंबर चारी जवळ असलेल्या एका विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे . विशाल रायभान सावंत वय बारा वर्ष रा. कुडगाव, तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हल्ली राहणार 17 नंबर चारी जवळ जानोरी तालुका दिंडोरी हा सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शौचास जातो सांगून विहिरीजवर पाणी घेण्यासाठी गेला असता तोल जाऊन त्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.. पुढील तपास पोलीस नाईक सुदाम धुमाळ करत आहे.