कृषिकन्यांनी साजरा केला विद्यार्थ्यांसोबत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’..
चांदवड येथील जिल्हा परिषद शाळेत साजरा केला योग दिन..
दक्ष न्युज प्रतिनिधी: आनंद बडोदे
चांदवड: शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळेच गेल्या दशकभरापासून दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो.

याच पार्शवभूमीवर चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील या कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला. यावेळी विद्यार्थिनींनी शाळेतील चिमुकल्यांना योगासन शिकवले.
दरवर्षी RAWE म्हणजेच Rural agricultural work experience (ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम )आणि AIA म्हणजेच Agro industrial attachment (कृषी आधारित उद्योग) असे उपक्रम महाविद्यालयामार्फत राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून या कृषिकन्यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी डी भाकरे , RAWE समन्वयक प्रा.श्वेता सातपुते व कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रतिक्षा पवार यांच्या मार्गर्शनाखाली हा उपक्रम राबवला आहे.