नागरिकांना बाल धोरण व कृती आराखड्या बाबत हरकती व सूचना पाठविण्याचे आवाहन..
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
नाशिक: महिला व बालविकास विभाग अंतर्गत बाल धोरणाचा प्रारूप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आलेली होती. या गठीत समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केलेला आहे.

तरी नागरिकांनी प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 च्या संदर्भात काही हरकती व सूचना असल्यास 30 जून,2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठविण्यात याव्यात असे, आवाहन, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त, पुणे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
सदर प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या http://womenchild.maharashtra.gov.in व http://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
ज्या नागरिकांना या प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखड्याबाबत हरकती व सूचना असल्यास त्यांनी 30 जून,2024 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे, 01 या पत्यावर किंवा childpolicy@gmail.com या ईमेर वर पाठविण्यात याव्यात असेही, प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.