नाशकात होर्डिंग्सबाबत शिवसेना युवासेना आक्रमक! शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा..


करणसिंग बावरी, दक्ष न्युज

नाशिक: मुंबई येथे होर्डिंग पडल्याने अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता शिवसेना युवासेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील उभारण्यात आलेल्या होर्डिंग बाबत शिवसेना युवासेना तर्फे निवेदन नाशिक महानगरपालिकेला देण्यात आले आहे.

मागील काही दिवसात घाटकोपर मुंबई येथे मोठे जाहिरात फलक वादळी वारा व पावसामुळे पडून अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला पुढील काही दिवसातच नाशिक शहरात पावसाचे आगमन होणार आहे तसेच शहरात कधी पण अवकाळी पाऊस व वारा येत असल्याने नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील उभारण्यात आलेल्या या होर्डिंग बाबत युवा सेनेने हे निवेदन दिले आहे.

  • काय आहे मागणी?

महापालिकेचे खाजगी जाहिरात दार व अधिकृत जाहिरातदार यांचे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर ऑडिट करणे बंधनकारक आहे, तसे नाशिक महानगरपालिकेने केले आहे का? त्याचा अहवाल कधी प्रसिद्ध केला याचा तपशील लेखी स्वरूपात देण्यात यावा.

येणाऱ्या काळात घाटकोपर मुंबई प्रमाणे नाशिक शहरात घटना घडली तर याच सर्वस्वी नाशिक महानगरपालिका व संबंधित अधिकारी जबाबदार असतील. त्यामुळे आपण त्वरित या सर्व जाहिरात फलकांवर योग्य ती कारवाई करून खास करून महानगरपालिकेने रस्त्याच्या मधोमध वाहतूक बेटांवर लावलेले जाहिरात फलक पहिले काढावे अन्यथा युवासेना ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना धडा शिकवेल.

अशा आश्वासन निवेदन शिवसेना युवासेना तर्फे नाशिक महानगरपालिकेला देण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिक महानगरपालिका या होर्डिंग वर काही कारवाई करणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *