अमोल दिनकर पाटील यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

नाशिक: प्रतिनिधी

नाशिक शहर भाजपा युवा मोर्चा आणि युवा ऊर्जा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तसेच नाशिक महानगरपालिका माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर अण्णा पाटील आणि माजी नगरसेविका लता काकू दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल दिनकर पाटील आणि त्यांची टीम रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज धावून गेले.

अमोल दिनकर पाटील आणि त्यांच्या पथकाने महाड तालुक्यातील ढालकाठी गाव,खरवली गाव,वडवली गाव, शिरगाव,कोलगाव या गावांमध्ये जाऊन पुरग्रस्तांना मदत केली आणि त्या टीम बरोबर असलेल्या डॉक्टरांनी पूरग्रस्तांची सुश्रुषा केली तसेच औषधे वाटप केली. यावेळी 500 ब्लांकेट्स, 2000 पाण्याच्या बॉटल,12000 बिस्किट पॅकेट, 5000 सर्जिकल मास्क, 1000 नानकटाई बिस्किट पॅकेट्स आदि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

या ठिकाणची परिस्थिती अतिशय गंभीर असून पुनर्वसनाचा प्रश्न भयंकर आहे. येथील नागरिकांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. येथील नागरिकांमध्ये दुःख आहे, निराशा आहे आणि मदतीची अपेक्षा आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *