मी लढणार आणि नडणार: विजय करंजकर
- देवळाली कॅम्प येथे करंजकर समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन
दक्ष न्यूज प्रतिनिधी : भास्कर साळवे
नाशिक : नाशकात लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळतेय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत असून अनेकांमध्ये नाराजी देखील आहे. त्यातच ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी आहे. परंतु मी लढणार आणि नडणार असं विजय करंजकर म्हणालेत. याच पार्श्वभूमीवर विजय करंजकर समर्थक व हितचिंतक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

- विजय करंजकर निवडणूक लढवण्यावर ठाम
गेली चौदा वर्षे जिल्हा प्रमुख पद मिळाले असतांना सर्वांना बरोबर घेऊन पक्षाला गा्मपंच्यायत ते खासदार निवडणूका मध्ये विजयी केले आहे. मात्र मला शब्द देऊन हि नाशिकच्या जिल्हा पदाधिकार्यांनी पक्ष प्रमुखांना चुकीची माहिती देऊन कान भरले उमेदवारी साठी इच्छुक नसतांना त्यांना उमेदवारी देऊन माझी उमेदवारी रद्द केली. येत्या दोन दिवसांत आपण लोकसभेचा निर्णय घोषित करुन आता पुन्हा लढणार आणि नडणार असा घणाघात उद्धव ठाकरे सेनेचे विजय करंजकर यांनी केला आहे.
दरम्यान शुक्रवारी करंजकर यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर शनिवारी देवळाली कॅम्प येथील ओरियंट गेस्ट हाऊस लॅम रोड येथे समर्थक व हितचिंतक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी निवडणूक लढणार असल्याचे पुन्हा एकदा सांगत बंडखोरी वर ठाम असल्याचे सांगितले करंजकर यांना उद्धव सेनेने तिकीट नाकारल्या नंतर ही त्यांनी निवडणूक लढणार आणि नडणार असा इशारा दिला होता. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी केलाय . करंजकर यांची उमेदवारी उद्धव सेनेकडून ऐनवेळी रद्द करुन राजाभाऊ वाजे यांना दिल्यामुळे करंजकर समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून पुढील वाटचाल कशी राहील या बाबत निर्णय घेण्यासाठी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपजिल्हाप्रमुख दिपक खुळे, महिला आघाडीच्या प्रमुख मंदा दातीर, पवन आडके, संजय तुंगार, नितीन चीडे, तालुका प्रमुख नवनाथ गायधनी, नाशिक तालुका प्रकाश म्हस्के, गुंड्डाप्पा देवकर, शामशेठ गणोरे, चंदुनाना कासार, संदिप गुंजाळ, मीनिश झंवर, सोमनाथ पानसरे, रामा सांगळे, बबनराव कांगणे ,विलास कड, शरद उबाळे, बाळासाहेब साळवे, मनोहर अंबेकर, शामराव ढगे, चंदुनाना गोडसे आदींसह अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी नाशिक का खासदार कैसा हो विजय आप्पा जैसा हो अशा घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केलय. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संग्राम करंजकर व वैभव पाळदे यांनी केले. तर आभार विक्रम सोनवणे यांनी मानले .