लज्जास्पद! लॉजिंगमध्ये येण्यासाठी महिलांना अश्लील इशारे; महिलांची सुरक्षितता धोक्यात..
त्र्यंबकेश्वर येथील धक्कादायक घटना..
नाशिक: शहर सध्या अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडले आहे. शहरात अवैध धंदे, गुन्हेगारी, टवाळखोरी थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे पवित्र स्थान मानले जाते. मात्र या त्र्यंबकेश्वर मध्येच अश्लील चाळे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्र्यंबकमध्ये बेकायदेशीर लॉजिंगमुळे परिसरात कायद्याचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असून महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐराणीवर आला आहे.
धक्कादायक म्हणजे त्र्यंबक रोडवरील लॉजिंग बाहेर बसलेल्या काही टवाळखोरांकडून महिला आणि मुलींची छेड काढली जात असुन त्यांना लॉजमध्ये येण्यासाठी अश्लील असे इशारे करण्यात येतात. यामुळे महिला तसेच शाळा व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर…
त्र्यंबककडे जाणाऱ्या रस्त्यात सध्या ३०० लॉजिंग सुरू आहे. सरसपणे येथे ऐवैदरीत्या अनैतिक व अश्लील असे व्यवसाय सुरू आहेत. कमीभरामध्ये सहजरित्या या ठिकाणी लॉज उपलब्ध होत असल्याने येथे सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहे.
दरम्यान त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असल्याने येथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी परिसरामध्ये लॉजिंगची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या लॉजिंगचा उपयोग अश्लील चाळे करण्यासाठी होत असल्याचं समोर आल आहे.
आज सर्वत्र महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीचे काम करतात. त्र्यंबकेश्वर सारख्या पवित्र ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न असून हे अनधिकृतपणे सुरू असलेले लॉजिंग बंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.