हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने गुढीपाडवा उत्साहात साजरा…


दक्ष न्युज, करणसिंग बावरी

नाशिक: शहरात सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने देखील श्री टेबलाई माता मंदिर येथे गुढी उभारून पूजन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी गुढी उभारली जाते. याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हाच विजयोत्सवाचा दिवस.

घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस मानला जातो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आहे.

दरम्यान दरवर्षी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने श्री टेबलाई माता मंदिर येथे गुडी उभारून पूजन करून नवीन वर्षाचे अगदी उत्साहात स्वागत केले जाते. यंदाही श्री टेबलाई माता मंदिर येथे गुडी उभारण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *