एक गुढी सुरक्षेची! कळसा ऐवजी चक्क हेल्मेट ठेवून उभारली गुढी..
दक्ष न्युज प्रतिनिधी
नाशिक: आजच्या जगात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडे लक्ष न देणे. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे रस्ते अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्ते सुरक्षेचे नियम पाळले जावोत आणि सर्वसामान्यांना त्याबाबत माहिती व्हावी यासाठी विस्टा फेज २ इंदिरा नगर येथील राहुल शिंपी व शिंपी कुटुंबीयांनी अनोखी गुढी उभारली आहे.
यात कळसा ऐवजी चक्क हेल्मेट ठेवून सुरक्षेचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच रस्ता सुरक्षेबाबत माहिती असलेला हार या गुढीला वाहण्यात आला आहे. त्यात नशा करून वाहने चालवू नये, हेल्मेटचे महत्व, ट्रॅफिक सिग्नल बाबतची माहिती, पोलीस मित्र, वेगाचे भाण , टॅफिक सूचनान बाबत माहिती आदींची माहिती त्यात दर्शवली आहे.
या अनोख्या गुढीद्वारे समाज प्रबोधनाचं कार्य शिंपी कुटुंबीयांनी केलं आहे. यामुळे या अनोख्या गुढीची चर्चा सर्वत्र होत असून शिंपी कुटुंबाचं कौतुक होत आहे.