क्रेडाई रिजनल प्रॉपर्टी महोत्सवाची सांगता..
महोत्सवात ग्राहाकांचा उदंड प्रतिसाद..
दक्ष न्यूज प्रतीनिधी, भास्कर साळवे
नाशिक: ग्राहकांना आवडीच्या ठिकाणी घर घेणे सोपे व सुलभ व्हावे यासाठी क्रेडाई मेट्रो तर्फे दोन दिवसीय रिजनल प्रॉपर्टी महोत्सवाचा शहरातील विविध पाच ठिकाणी शुभारंभ करण्यात आला होता. गंगापूर रोड वरील वृंदावन लॉन्स महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा गोविंद नगरच्या मनोहर गार्डन येथील महोत्सवाचे महानगर पालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर दिंडोरी रोड वरील पवार लॉन्स येथिल महोत्सवाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत बच्छाव पंचवटीतील स्वामिनारायण लॉन्स येथील महोत्सवाचे नाशिक महानगरपालिकेचे नगर रचना उपसंचालक हर्षल बाविस्कर तर नाशिकरोड येथील ईच्छामनी लॉन्स महोत्सवाचे उद्घाटन महावितरणचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते पार पडले.

आगामी सणासुदीचा कालावधी लक्षात घेता या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणावर उलाढाल होईल अशी अपेक्षा मेट्रो चे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले तसेच याप्रसंगी सनासुधीच्या शुभमुहूर्तावर अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण होईल असा आशावाद आयोजक नरेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला या प्रदर्शनात देवळाली कॅम्प येथील शहा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स चे संचालक अतिष महेंद्र शहा यांच्या वतीने ईच्छामनी लॉन्स येथे स्टॉल लावण्यात आला होता.
यावेळी व्यावस्थापक अनिकेत आम्रे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की या प्रदर्शनात आपल्या पसंतीचं घर आपणास घेता येईल असे सांगितले या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष कुणाल पाटील नरेंद्र कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते. प्रदर्शनाचे आयोजन सचिन बागड, विजय चव्हाणके, अनंत ठाकरे, सतीश मोरे, सुजय गुप्ता आदिंनी केले होते. या प्रदर्शनात किरण भोर, पौर्णिमा गाडेकर, अजित भवर, प्रतिक कोठुळे, प्रणय ताजणे, गणेश कासार, स्वप्निल माळुजकर आदींनी ग्राहाकांना मार्गदर्शन केले.