देशात समान नागरी कायदा लागू करा- हिंदू एकताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी


नाशिक: प्रतिनिधी

समान नागरिक क़ायदा लागू करा या मागणीसाठी नाशिक महानगर व जिल्हा हिंदु एकता आदोलन पक्ष तर्फे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी नाशिक यांचें मार्फत निवेदन आज सोमवार 19 जुलै रोजी पाठविण्यात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण झाले परंतु भारतीय राज्यघटनेने एकता, समानता व एकात्मता राष्ट्रवाद हे तत्व मान्य केले आहे, म्हणून भारतातील सर्वाना एकच कायदा असावा. दिल्ली उच्च न्यायालय यांनी समान नागरिक कायदा सरकारने लागू करावा असे सूचित केले आहे. म्हणून न्यायालयाचा आदर ठेवून तमाम भारतीयांसाठी एक देश एक कायदा गरजेचा आहे. व्यक्तिगत कायदयामुळे घटनेच्या तत्वात उनिव असून एक देश एक कायदा असणे काळाची गरज आहे.

जात, पंथ व धर्माचे व्यक्तिगत कायदे नसावे. लग्न, संतती, पोटगी, शिक्षण यासाठी समान कायदा असावा, भारतीय राजयघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या मार्गदर्शक तत्वात कलम ४४ मध्ये काळानुरूप बद्दल करुन समान नागरी कायदा करता येईल असे नमूद केले आहे. म्हणून आपल्या कड़े बहुमत आहे या बहुमताचा फायदा घेत समान नागरिक क़ायदा त्वरित लोकसभेत पारित करावा.

हिंदुस्थानच्या आजच्या परस्थितीत जसा एक देश – एक कर (जी एस टी) लागू केला याच पद्धतीने देशातील जातीयवाद, लोकसंख्यवाद, अलगतावाद, बेकारी, दारिद्रयवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे समान नागरी कायदा होय. प्रत्येक धर्माला वेगळा कायद्यामुळे विषमता निर्माण होऊन राष्ट्रीय ऐकयाला बाधा पोहचते, वाढत्या लोकसंख्येला आळा घालने हे आजचे राष्ट्रीय प्रथम कर्तव्य आहे. समान नागरी कायदा लागू करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्ष महाराष्ट्र ४९ वर्षांपासून करीत आहे. म्हणून मोदिसाहेब आपण तात्काळ निर्णय घेउन देशात समान नागरिक कायदा लागु करावा ही विनंती करण्यात आली.

हे निवेदन देताना राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, कैलास यंदे जिल्हाध्यक्ष, किशोर बागमर, किरणसिंग पवार श भगतसिंग चौक, अनिल जाधव द्वारका विभाग, राजेन्द्र नेरकर पंचवटी विभाग, प्रसाद बावरी युवाध्यक्ष, मनोज मराठे संघटक, अतुल रयसिंगे, कृष्णा घटमाले ,अनिकेत खरडे विद्यार्थी एकता आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *