नाशिकमहाराष्ट्र

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने घातला ६२ लाखांचा गंडा; द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची केली फसवणूक..


दक्ष न्युज प्रतिनिधी, आनंद बडोदे

वडनेर भैरव: पंचक्रोशीतील जवळपास १८ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलीय. परभणी येथील नर्सापूर येथील व्यापाऱ्याने ६२ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची केलीय. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेत व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे लवकरात लवकर काढून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केलीय. दरम्यान दादा भुसे यांनी पोलिस अधीक्षकांना संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ देण्याच्या सूचना केल्यात.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नर्सापूर येथील व्यापारी महादेव बाबासाहेब गडदे याने ३० ते ३५ रुपये दराने जवळपास २,२०० क्विंटल द्राक्ष खरेदी केले होते. मात्र द्राक्ष खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने गंडा घातल्याचे लक्षात आले. एक ते दीड महिना उलटूनही संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा यांची भेट घेतली.

यासंदर्भात वडनेर भैरव पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता या व्यापाऱ्याला आळा कधी घालणार हे बघणे महत्वाचे ठरणारे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *