नाशिक ठरणार आगामी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रबिंदू
नाशिक : दोन दिवसांपूर्वीच खा. संभाजी राजे नाशिक दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर, मराठा क्रांती मोर्चातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक हे केंद्रबिंदू ठरल्याचे चित्र आहे…
गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी शांतता व संयम राखण्याचे मराठा समाजाला आव्हान केले होते.
समाजानेही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, गेल्या काही वर्षांमध्ये छत्रपती संभाजी राजे यांची नाशिक भेट सातत्याने होऊ लागली आहे त्यांचा मवाळ स्वभाव सगळ्यांना माहिती आहे .
मात्र नाशिकमध्ये छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका पहिल्यांदाच आक्रमक पाहायला मिळाली. त्यामुळेच पुढील आरक्षणासंदर्भातील रणनीती नाशिक मधेच ठरू शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.