चिअर फॉर इंडिया; नाशिक जिमखाना येथे ऑलिम्पिक 2020 सेल्फी पाईंट


  • भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी नाशिक मध्ये सेल्फी पॉईंट चे मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते उदघाटन

नाशिक: विक्रम भास्कर

जपान ची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक 2020 च्या भारतीय खेळाडू चे मनोबल वाढविण्यासाठी सेल्फी काढून सोशल मीडियावर पाठवून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. आज सोमवार (दि.19) सकाळी 10.00 वाजता शालिमार येथील नाशिक जिमखाना येथे चिअर फॉर इंडिया चे आयोजन करण्यात आले होते. चिअर फॉर इंडिया, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जय घोषात भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

खेळाडू ने अनेक वर्ष परीक्षम केल्यानंतर त्यांना ऑलिंपिक साठी निवड होते. त्यांच्या आयुष्यातील त्या खेळासाठी घेतलेलं कष्ट यांचा तासात निर्णय होणार असतो. सध्या जगात आयोग्यकडे लक्ष दिले जात आहे.. त्यामुळे नाशिक मध्ये देखील अयोग्य व्यवस्थेकडे संपूर्ण यंत्रणा काम करीत आहे.. म्हणून खेळाकडे दुर्लक्ष होते असल्याचा खेद मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे नाशिक जिमखाना अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी आयोजन केलं होते.

या प्रसंगी सायली वाणी (इंदौर येथे 14 वर्ष खालील वयगोट मध्ये सवर्ण पदक) आणि तनिषा कोटेचा (इंदौर येथे 14 वर्ष खालील वयगोट मध्ये कांस्य पदक) विजेत्यांचे पद मिळविल्या ने त्यांचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपसंचालक क्रीडा व युवा सेवा चे चद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी दीपक पाटील, मंदार देशमुख, हेमंत पांडे, शैलेजा जैन, जयवंत कर्पे, राकेश पाटील, मयूर करोटे, आणि मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अविनाश टीळे तालुका क्रीडाधिकारी यांनी मानले.

टोकियोमध्ये मुळात 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं. पण कोव्हिड 19च्या जागतिक साथीमुळे ते वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आलं. आता 2021 वर्षात हे ऑलिंपिक होत असलं तरी या खेळांना ‘टोकियो 2020’ म्हणूनच संबोधण्यात येतंय.

2020 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. हे ऑलिम्पिक मुळात 2020मध्ये होणार होते म्हणून याला 2020 Olympics म्हटलं जातंय. या स्पर्धा तेव्हा कोव्हिडमुळे पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.

  • पॅराऑलिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर होणार आहेत.
  • ऑलिम्पिकमध्ये 33 स्पर्धा आणि 339 इव्हेंट्स असतील आणि 42 ठिकाणी हे सगळं पार पडेल.
  • पॅराऑलिम्पिकमध्ये एकूण 22 खेळांचे 539 इव्हेंट्स होतील आणि 21 ठिकाणी या स्पर्धा होतील.
  • महाराष्ट्रामधील 10 खिलाडू ही आनंदाची बाब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *