निसर्ग संस्कार इंग्लिश स्कूलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न..


दक्ष न्युज प्रतिनिधी, उमेश कापडणीस

कळवण: विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनातून वैज्ञानिक प्रवृत्ती जागरूक व्हावी म्हणून अशा विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ अरुण काळे यांनी मानूर येथे निसर्ग संस्कार इंग्लिश स्कूल येथे भरलेल्या ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रसंगी केले अध्यक्ष स्थनी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे होते.

पुढे बोलताना डॉ. अरुण काळे म्हणाले की, सुखदेव उशीर व हेमंत बच्छाव साहेब यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना एक विज्ञान प्रदर्शन भरून वेगवेगळे शास्त्रदन निर्माण करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. विध्यार्थ्यांनी याचा योग्य उपयोग करून वेगवेगळे शोध लावावेत असे आवाहन केले यापसंगी कळवण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस भूषणदादा पगार, गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील, शेतकी संघाचे संचालक राजेंद्र पवार, माजी प्राचार्य एन पी पवार, मानूरचे उपसरपंच साहेबराव पवार, पोलीस निरीक्षक खगेंद् टेम्भेकर, पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे, पत्रकार रवींद्र बोरसे, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, प्राचार्य जी डी रौंदळ, प्रा विकास रौंदळ, विस्तार अधिकारी संजय चव्हाण,वर्षाताई बच्छाव परशराम महाले, शीतल कोठावदे, अनिता बागुल, कांतीलाल बागुल, सुदाम राऊत, दीपक निकम, सौ प्रा संगीता पवार, संजय आहेर, यशवंत सूर्यवंशी, विनायक जाधव, पंकज उशीर, शरद खैरनार, निलेश भामरे, आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी वर्षा बच्छाव, निलेश पाटील, राजेंद्र पवार, यांनी मनोगत व्यक्त कले. सूत्रसंचालन प्रा. किशोर पगार, तर आभार प्रा. भरत पाटील यांनी मानले.

यावेळी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन करतांना डॉ. अरुण काळे, डॉ. रावसाहेब शिंदे ,गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, पोलीस निरीक्षक खगेंद्र टेम्बेकर, उपनिरीक्षक बबन पाटोळे, गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, सुखदेव उशीर, प्राचार्य जी. डी. रौंदळ, माजी प्राचार्य एन. पी. पवार, राजेंद्र पवार, प्रा. एन. एन आहेर,के एच खैरनार उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *