ओबीसी संघर्ष सुवर्णकार समितीच्या शहराध्यक्ष पदी बेदरकर

नाशिक: प्रतिनिधी

ओबीसी संघर्ष सुवर्णकार समितीच्या शहराध्यक्ष पदी सागर बेदरकर यांची निवड काल झालेल्या बैठकीत करण्यात आली.

त्याप्रसंगी समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री बाळासाहेब कर्डक समता परिषदेचे श्री योगेश कमोद सुवर्णकार समाजाचे सर्वश्री राजेंद्र दिंडोरकर , गजु घोडके , नंदकुमार फाकटकर , चारु घोडके , शाम बिरारी , दिलीपभाई सोनार , संजय मंडलिक , बाळु खोलमकर , दिलीप घोडेकर , कृष्णा बागुल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

सागर बेदरकर यांच्यावर सर्व मित्र परिवार व हितचिंतक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *