मनमाड शिवसेनेतर्फे मराठा आरक्षण जिल्हास्तर,तालुका समिती अध्यक्ष,प्रांत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन..
दक्ष न्युज प्रतिनिधी, गणेश केदारे
मनमाड: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा तालुका स्तरावर स्वातंत्र्य कक्षाची स्थापना होऊन अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समिती स्थापन करण्यात आलेली असून त्या माध्यमातून शासनाने आदेशान्वये १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यात कुणबी कागदपत्रे आढळल्यास त्याची स्कॅनिंग करून जतन करायचे आहे तसेच त्याची माहिती समितीकडे जमा करायची आहे. आपल्या तालुक्यातील महसुली भूमी अभिलेख महसुली शैक्षणिक अभिलेख जन्ममृत्यू नोंदवया तसेच इतरही शासकीय कार्यालयातील उर्दू मोडी लिपी जाणकार व्यक्तींच्या माध्यमातूनही मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी नोंदीचे काळजीपूर्वक दस्तावेज शोधण्याचे काम समितीने करणे अपेक्षित आहे.
आपल्या तालुक्यातील मराठा समाजाच्या अनेक कुणबी प्रमाणपत्र मागणीचे प्रस्ताव प्रलंबित राहिलेले असून नोंदणी न सापडल्याने पात्र असताना सुद्धा समाज हा आरक्षणापासून वंचित राहत असल्याने तालुक्यातील प्रचंड रोष तयार झालेला आहे या सर्वांना न्याय देण्याचे काम आपल्या माध्यमातून होणार आहे.

तरी सर्व शासकीय कार्यालयातून दस्तावेज जमा करण्याचे नियोजन हे काळजीपूर्वक व गांभीर्याने व्हावे त्याच्या कार्यपद्धतीवर आपण स्वतः लक्ष देऊन जास्तीत जास्त कागदपत्रांची छाननी व्हावी व मोडी उर्दू जाणकार यामध्ये नेमून सर्व शासकीय विभागातील नोंदणीचे दस्त तपासले जातील याची काळजी घ्यावी. सदरील विषय हा सर्व सामान्य मराठा लोकांच्या जीवनाशी भावी पिढीच्या भविष्याशी निगडित असल्याने या प्रक्रिया औपचारिक न होता गंभीर्याने होऊन त्याचा पूर्ण कराव्यात दस्तावेज तपासणी मधून कोणताही शासकीय विभाग राहून जाऊ नये आपल्या माध्यमातून मिळणाऱ्या न्यायाकडे सकल मराठा समाज नांदगाव तालुका आपल्याकडे मोठ्या उपेक्षेने पाहत आहे त्याची जाणीव आपण करून देणे साठी आपणास विनंती आशयाचे पत्र मनमाड शहर शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी साहेब येवला यांना देण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे शहर प्रमुख मयूर बोरसे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील मुकुंद झाल्टे गणेश सोमासे विलास शेळके उपस्थित होते.