राज्यातील ४४ विद्यार्थ्यांना बालदिनी बाल पुरस्कार जाहीर..
यामध्ये दहिवड येथील समृद्धी श्रावण सोनवणे हिचा समावेश..
आदीनाथ ठाकूर, दक्ष न्यूज प्रतिनिधी
देवळा: राज्यातील ४४ विद्यार्थ्यांना बालदिनी बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये देवळा तालुक्यातील दहिवड येथील शिक्षक श्रावण सोनवणे यांची कन्या समृद्धी श्रावण सोनवणे हिचा पुरस्कारामध्ये समावेश आहे. शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना भावी वाटचालीस उत्साहीत करणे असा महत्त्वाचा उद्देश ठेवून हि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अ , ब आणि क अशा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बाल ४४ चित्र कलाकारांना सन्मान चिन्ह , प्रशस्तीपत्रक व शिक्षक ध्येयाचे मासिके देण्यात आले. समृद्धी श्रावण सोनवणे हिने नाशिक जिल्ह्याचे देवळा तालुक्यातील दहिवड गावाचे नाव रोशन केले असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे अनुदानित आश्रम शाळेचे चेअरमन जितेंद्र अहिरराव व संचालक मंडळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच गावातील विविध मान्यवरांमार्फत तिचे कौतुक करण्यात आले व भावी वाटचालीस तिला शुभेच्छा देण्यात आल्या.