अद्वय हिरेंची सुटका नाहीच, कोर्टाने २० नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
दक्ष न्युज, प्रतिनिधी.
मालेगाव: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेणुका सूतगिरणी कडून साडेसात कोटी रुपये कर्ज घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अद्वय हिरे यांना भोपाल मधून ताब्यात घेतले होते. काल दिनांक १६ नोव्हेंबर रोजी त्यांना मालेगाव कोर्टात हजार केले असता त्यांना २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- काय होते प्रकरण?
अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगाव तालुक्यातील रमझानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणी कडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने तीस कोटींच्या वर रक्कम गेली होती.

त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर कायदा ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली असता हायकोर्टाने जामीन नाकारल्याने पोलिसांनी अद्वय हिरे यांना भोपाळ मधून ताब्यात घेतले होते. दरम्यान काल त्यांना मालेगाव कोर्टात हजर केले असता २० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.