वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली अखेर रद्द..
प्रवीण सुरुडे, दक्ष न्युज प्रतिनिधी
नाशिक: अंबड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची दिनांक १ नोव्हेंबर रोजी अचानक बदली करण्यात आली होती. नियंत्रक कक्षात पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची बदली करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला होता. यासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन देखील देण्यात आलं होत तसेच आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची पुन्हा अंबड येथे फेर नियुक्ती करण्यात आली असून बदली अखेर रद्द करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर…
मराठा समाजाच्या वतीने अंबड परिसरातील आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयाला टाळे फासण्यात आले होते. त्यानंतर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आंदोलन करणाऱ्या आंदोलकानावर कारवाई न केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी वाघ यांची थेट नियंत्रण कक्षात बदली केली होती.
परंतु वाघ यांनी आंदोलन कर्त्यानवर गुन्हे दाखल केले होते. तरी सुद्धा सत्ताधारी आमदाराच्या दबावापोटी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी वाघ यांच्या बदलीचे आदेश काढले होते. त्यानंतर नागरिकांकडून अधिकारी प्रमोद वाघ यांची बदली तात्काळ रद्द करावी या मागणी साठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते.
दरम्यान आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची पुन्हा अंबड येथे फेर नियुक्ती करण्यात आली असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.