लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरा…
अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघातर्फे जयंती साजरा..
संकेत भंगाळे, दक्ष न्युज प्रतिनिधी
नाशिक: अखंड भारताचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आली. अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघातर्फे या जयंती उत्सावाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली. माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूकिस प्रारंभ करण्यात आला. त्रिमूर्ती चौक, सावता नगर, पवन नगर , उत्तम नगर, शुभम पार्क असा या मिरवणुकीचा मार्ग होता. दरम्यान या मिरवणुकीस मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.