ऑलम्पिकमध्ये टी – २० क्रिकेटचा थरार
राष्ट्रकुल, एशियाड नंतर क्रिकेटची जागतिक व्याप्ती वाढणार
दक्ष न्यूज प्रतिनिधी
मुंबई: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आता ऑलम्पिकमध्येही टी -२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या वार्षिक सभेत २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलम्पिक मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णयाला मंजुरी दिली.
क्रिकेट प्रमाणे बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल या खेळांच्या समाजावर शिक्कामोर्तब केला. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीस या पाच खेळांचा समावेश करण्याची शिफारस लॉस एंजेलिस ऑलम्पिक संयोजन समितीने केली होती.
समितीच्या कार्यकारिणीने त्यास शुक्रवारी मंजुरी दिली. सोमवारी त्यावर शुभकामोर्तब करण्यासाठी झालेल्या मतदानात ९९ पैकी केवळ दोनच प्रतिनिधींनी क्रिकेटच्या समावेशास विरोध केला. त्यानंतर प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी दिली.