इराणच्या विदेशी महिला सोबत बॉलिवुडच्या कोरिओग्राफरसह 22 जणांना इगतपुरीच्या रेव्हपार्टीत अटक


नाशिक: (विशेष प्रतिनिधी)

  • नाशिक ग्रामीण पोलिसांची धकड कारवाई
  • ड्रग्स व हुक्का अंमलीपदार्थ केले जप्त

इगतपुरीमध्ये अवैधरित्या सुरू असलेले ड्रग्स पार्टीवर ग्रामीण पोलिस अधीक्षक व त्यांच्या विशेष पथकाने छापा टाकुन  कोकेन व हुक्का अंमलीपदार्थ सेवनाने मद्दधुंद असलेले १० पुरुषांसह १२ महिलांना अटक केली. दक्षिणेतील सिनेमा जगतातील  कलाकरांसह एका इराणी परदेशी महिलेचा यात समावेश आहे तर पार्टीला ड्रग्स व अंमलीपदार्थ पुरविरणारा नायजेरीयनला मुंबईहुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

या ड्रग्स पार्टी बाबत ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, इगतपुरी परिसरातील दोन खाजगी बंगल्यांमध्ये काही उच्चभ्रु वस्तीतील महिला असे अवैधरित्या पार्टी करत असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.  मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून पोलिस अधीक्षक  सचिन पाटील यांनी पोलिस पथकांसह इगतपुरी येथील स्काय ताज व्हीला व स्कायला लगुन असलेल्या व्हीला येथे अचानक छापा टाकला. याठिकाणी १० पुरुष व १२ महिला असे एकुण २२ जण अवैधरित्या ड्रम्स व हुक्क्याचे सेवन करतांना मद्यधुंद अवस्थेत मिळुन आले.  

छाप्यात कोकेन व इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी काही महिलांनी दक्षिण आणि बॉलिवुड फिल्ममध्ये अभिनय केलेल्या असुन काही महिला कोरिओग्राफर देखील आहे तसेच यातील एक महिला इराण या देशातील  परदेशी  नागरीक असुन तर एका महिलेने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेला आहे. 

स्काय ताज व्हीला व स्कायला लगुन असलेल्या  व्हीला येथील इतर स्टाफला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. छाप्यात मिळुन आलेले अंमलीपदार्थ कोठुन आणले गेले याबाबत माहिती घेवुन एक तपास पथक तात्काळ मुंबई येथे रवाना करण्यात आले व मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई येथुन एका नायजेरियन परदेशी नागरीकास पोलिस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेवुन इगतपुरी येथे आणले व चौकशी सुरू केली आहे.  

या  अवैध ड्रग्स पार्टी प्रकरणी इगतपुरी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असुन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक  सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामिणच्या शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास इगतपुरी पोलिस करीत आहे.

गोपनीय माहितीवरुन शनिवारी मध्यरात्री आम्ही छापा टाकला. या कारवाईत एकूण २२ लोकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन कोरियोग्राफर, एक रिअॅलिटी शोमधील अभिनेत्री आणि एक विदेशी महिलेचा समावेश आहे. कोकेनसारखे अंमली पदार्थांचे सेवन या सर्वांकडून केले जात होते. अंमली पदार्थाचा पुरवठा कोणी व कोठून केला? यांच्यासोबत अजून काही साथीदार होते का? आदी बाबींचा तपास केला जात आहे. एक पथक मुंबईला रवाना झाले आहे. सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *