ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही; राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातून भाजपाचा राज्य सरकारला इशारा



नाशिक: प्रतिनिधी

ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही  राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनातून भाजपा चा राज्य सरकारला इशारा देण्यात आला. चक्काजाम आंदोलन सकाळी १०.३० वा. जकात नाका, विल्होळी, मुंबई आग्रा रोड, नाशिक येथे करण्यात आले,ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी झालेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

या आंदोलनात भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, नाशिक शहर भाजप अध्यक्ष गिरीश पालवे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष .बाळासाहेब सानप महापौर सतिषनाना कुलकर्णी ,आमदार सीमाताई हिरे,आमदार श्री.राहुल ढिकले, भाजप प्रदेश प्रवक्ते श्री.लक्ष्मणराव सावजी, नाशिक महानगर भाजप संघटन सरचिटणीस नगरसेवक प्रशांत जाधव , जगन अण्णा पाटील, सुनील केदार ,भाजप जेष्ठ नेते श्री.विजय साने , कमलेश बोडके, उत्तम उगले, शहर उपाध्यक्ष अलका जांभेकर,भाजप ओ बी सी मोर्चा नाशिक महानगर अध्यक्ष चंद्रकांत थोरात ,भाजप ओबीसी मोर्चा नाशिक महानगर सरचिटणीस सतिष रत्नपारखी, प्रणव शिंदे,राजेंद्र महाले, सरचिटणीसओबीसी मोर्चा नाशिक महानगर राजेश दराडे , गणेश कांबळे, प्रा शरद मोरे, सातपूर मंडळाचे अध्यक्ष अमोल इगे, सिडको १ मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बरके, सिडको २ मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाटील, मध्य मंडळाचे देवदत्त जोशी, जुने नाशिक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव घोडेकर, द्वारका मंडळाचे अध्यक्ष सुनील देसाई , संतोष नेरे, नगरसेविका छाया देवांग, माधुरी बोलकर, राकेश दोंदे, माधुरी पढार – पालवे, डॉ मंजुषा दराडे, अर्चना दिंडोरकर , नंदू देसाई, विशाल जेजुरकर, सोमनाथ बोडके, चारुदत्त आहेर, ऋषिकेश आहेर, फिरोज शेख, सचिन हांडगे,प्रतीक शुक्ला ,प्रशांत वाघ,पवन उगले आदी आंदोलनात हजर होते. चक्काजाम आंदोलन सकाळी १०.३० वा. जकात नाका, विल्होळी, मुंबई आग्रा रोड, नाशिक येथे करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यातही एक हजारांहून अधिक ठिकाणी हे आंदोलन झाले. नागपूर येथील आंदोलनात सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे राजकीय षड्यंत्र आहे. आघाडी सरकारने वेळेत कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असती तर हे आरक्षण रद्द झाले नसते. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याची या सरकारची इच्छाच नाही असे वाटते आहे. कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याने राज्यभरात सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे आरक्षण गमाविण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे पुणे येथे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की सत्ताधारी पक्षातील काही मंडळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने विरोधी पक्षांच्या सहकार्याने तातडीने हालचाली करायला हव्यात.

खा. डॉ. प्रीतम मुंडे या परळी येथे,  प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे नाशिक येथे, प्रदेश उपाध्यक्ष खा. डॉ. भारती पवार यांनी निफाड येथे , खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे हे संभाजीनगर येथे, आ. गोपीचंद पडळकर हे सांगली, भाजप जेष्ठ नेते आमदार विखे पाटील राहता येथे, खासदार डॉ सुजल विखे पाटील अहमदनगर येथे, राम शिंदे जामखेड अहमदनगर येथे, खासदार डॉ हिनाताई गावित नंदुरबार येथे आंदोलनात सहभागी झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *