धुळ्यातील अभियंत्याला २५ हजाराची लाच घेताना अटक
- धुळे येथील तक्रारदाराचे एमआयडीसी भूखंडावर वाढीव बांधकाम मंजुरीचे प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी सिव्हिल इंजिनियर कन्सल्टंट अहमदनगर हसन अन्सारी याने धुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी 25 हजाराची लाच मागितली.
दक्ष न्यूज प्रतिनिधी
धुळे : ती स्वीकारताना एमआयडीसी धुळे कार्यालयाजवळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगे हात पकडले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परीक्षेत्रच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी धुळे येथील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, सापळा पथकातील सहकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी ,पोलीस हवालदार राजन कदम ,शरद कटके, पोलीस शिपाई संतोष पावरा, मकरंद पाटील ,प्रशांत बागुल, चालक पोलिस हवालदार सुधीर मोरे यांनी यशस्वी केली.