मराठा समाजाचा पुन्हा नाशिकमध्ये “एल्गार”
इतक्या दिवस समाज बोलला आता राजकारन्यांनो तुम्ही बोला ; मराठा आरक्षणासाठी उद्या मूक आंदोलन
नाशिक: करणसिंग पवार
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी खासदार संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली 16 जून पासून राज्यात एल्गार मोर्चा सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातून सुरू झालेले मूक आंदोलन नाशिक इथंही 21 जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्च्याचे वतीने नियोजन बैठक संपन्न झाली आहे. खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मूक आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे.
मराठा आरक्षण बाबत पुढील रणनीती काय असणार आहे, याविषयी चर्चा करण्यासाठी केवळ लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांना आमंत्रण करण्यात आले आहे. इतक्या दिवस समाज बोलला आता राजकारन्यांनो तुम्ही बोला अशी टॅगलाईन घेऊन गंगापूर रोड इथंल्या रावसाहेब थोरात मैदानात हे मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या मूक आंदोलनात काळा शर्ट, पॅन्ट, मुखपट्टी परिधान करून येण्याचे आवाहन केले असून डोंगरे वसतिगृह इथं वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
या आंदोलनानंतर खासदार संभाजी महाराज आपला पुढचा निर्णय जाहीर करणार आहे. म्हणून पुढचा निर्णय कोणता घेणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.