वणी ग्रामपंचायतच्या विविध रस्ते, सार्वजनिक वाचनालय, भुमीगत गटार, सांस्कृतिक हॉल या विकास कामांसाठी ना. झिरवाळ यांना निवेदन
दक्ष यूज प्रतिनिधी : सतीश इंद्रेकर
वणी : विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्याकडे वणी ग्रामपंचायतच्या विविध रस्ते, सार्वजनिक वाचनालय, भुमीगत गटार, सांस्कृतिक हॉल या विकास कामांसाठी वनी ग्रामपंचायत तर्फे त्यांच्या निवास स्थानी जाऊन त्यांना निवेदन देण्यात आले. झिरवाळ साहेबांनी होकार देत सर्व विकासकामे लवकरात करू असे आश्वासनही दिले.
निवेदन देताना वणी ग्राम पालिकेचे सरपंच मधुकरजी भरसतट, उपसरपंच विलास कड, महेंद्रशेट बोरा, ग्रामपंचायत सदस्य राहुल गांगुर्डे, जगन वाघ, जमीर शेख, अनिल मोहिते, मुन्ना मणियार, रवि सोनवणे, मनोज शर्मा, मनोज पावडे, सम्राट नेरकर, अमोल चोथवे, चेतन बागुल, सुनील बर्डे, विशाल कड, भरत पवार, चेतन बागुल आदी उपस्थित होते.