पेठ येथील संजय गायकवाड युवक आढळला मृतावस्थेत
- गावात त्याचे झाले होते काही युवकांबरोबर भांडण
दक्ष न्यूज प्रतिनिधी: योगेश कर्डिले
पेठ : येथील संजय गायकवाड या युवकाचा मृतदेह शेतात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस ठाण्याला घेराव घातल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका संशयिताला अटक केली आहे.
मंगळवारी २५ जुलैला रात्री त्याचे गावातील काही युवकांबरोबर भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी युवकाचे वडील घरासमोरील शेतामध्ये गेले असता त्यांचा मुलगा संजय गायकवाड हा झाडाला फाशी झालेल्या अवस्थेत दिसला.
यासंदर्भात कारवाई करण्यासाठी छावा मराठा सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भोर यांच्या मार्गदर्शनाखाली छावा मराठा सेना संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पोपट पताडे, दिंडोरी तालुका उपाध्यक्ष भास्कर पताडे, दिंडोरी तालुका कार्याध्यक्ष लहुजी राऊत व गावकऱ्यांनी पोलीस ठाणे आणि पोलीस अधिकाऱ्यांना घेराव घालून तक्रार दाखल करण्यास लावली होती. संशयित तरुणास पेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी अटक केली आहे.