सटाणा येथे मोर्चाला हिंसक वळण; अचानक दगडफेक, वाहनाची तोडफोड


दक्ष न्यूज प्रतिनिधी: प्रशांत कोठावदे

सटाणा : मणिपूर येथे आदिवासी समाजाच्या महिलांची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ सटाणा येथे आज आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात अचानक दगडफेक झाल्याने मोर्चाला हिंसक वळण लागले, दगडफेकीत काही जण जखमी झाले. भीतीने सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी पोचला आहे.


मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सटाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरी घोषणा देत असताना अचानक दगडफेक झाली. त्यामुळे मोर्चेकऱ्यांची पळापळ झाली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झल्याची माहिती मिळतेय. व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपापली द्काने बंद केल्याने शहरात संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या विषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *