श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी वाचवले एका 14 वर्षीय मुलीचे प्राण


नाशिक: प्रतिनिधी

जव्हार तालुक्यातील 4 अल्पवयीन मुली वडील हयात नाहीत
आई मतिमंद, अशा अल्पवयीन मुलींचे सामाजिक कार्यकर्ते
भगवान मधे यांनी स्वीकारले उपचार होई पर्यंत पालकत्व

जव्हार तालुक्यातील संतोष भाऊ धिंडा श्रमजीवी संघटना सचिव यांचा मध्ये यांना एक फोन आला त्यानी सांगितकले भाऊ जव्हारचे एक पेशंड नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे त्याना मदत करा मी त्याना सांगितले मला त्यांचा नबर द्या त्यानी नंबर दिला मधे यांनी जेव्हा फोन केला तेव्हा समजले की एक 14 वर्षाची मुलगी आहे तिला एडमिट केले आहे असे समजले आणि त्या मुलीच्या सोबत तिच्या तिघी बहिणी आहेत त्याना फोनवर देखील नीट बोलत येत नव्हते त्यातील ललिता नावाची मुलगी आहे तिने फोनवर रडत रडत सांगितले बाबा तुम्ही या हॉस्पिटलमध्ये मधे सुरगाणा वरून सक्रिय कार्यकर्ता मेळावा आटोपून रात्री उशिरा नाशिक मध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांची भेट घेतली तेव्हा समजले की ती मुलगी खूप आजारी आहे icu मध्ये होती ते लगेच सिव्हिल सर्जन याच्या सोबत बोललो आणि तिच्यावर लक्ष द्या असे सांगितले जेव्हा त्याना विचारले की तुमच्या सोबत कोण आहे त्या मुलीने सांगितले कि आम्हीच चौघी बहिणी आहोत आम्हाला वडील नाहीत ते मागील वर्षी च मृत्यु पावले आहेत आई आहे पण ती थोडी मतिमंद आहे म्हणून आणले नाही असे सांगितले.

त्याना विचारले जेवण केले का तर त्यांनी सांगितले आम्ही डबा आणला आहे मधे पुन्हा सकाळी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळी तिच्या वर उपचार करणारे डॉक्टर गाजरे यांनी सांगितले की तिच्या फुफुसात पाणी आहे तिचे ऑपरेशन करावे लागेल म्हणून तात्काळ त्यानी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागेल असे सांगितले त्या ठिकाणी मोफत ऑपरेशन होईल आरोग्य योजनेतून आम्ही लगेच त्या मुलीला स्वतः उचलून आंबूलन्स मध्ये बसवले तिला तात्काळ नाशिक मधील आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिच्या ज्या ऑपरेशन आधी ज्या तपासण्या आवश्यक होत्या त्या करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नव्हते ते पैसे देखील दिले या चारही मुली नाशिक मध्ये पहिल्यांदा आल्या आहेत
त्याना दाखल केले आणि विचारले पैसे आहेत का तर त्यांच्या कडे एकही रुपया नव्हता मशे यांनी त्याना जेवण करण्यासाठी 500 रु दिले परवा तिचे ऑपरेशन करायचे होते पण नातेवाईक यांची सही लागत होती आणि ज्या मुली आहेत त्या सर्व 15 वर्षा खालील आहेत म्हणून लगेच जाऊन ऑपरेशन साठी सही केली आणि तिचे फुफुसाचे ऑपरेशन यशस्वी झाले ह्या त्या चारही मुलींना जेवण देण्याची जबाबदारी घेतली आहे आता त्या मुलीची तब्येत बरी आहे मधे आज जाऊन भेट घेऊन आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *