नाशिक

दुरुस्तीच्या कामासाठी उद्या या 👇 भागातील पाणी पुरवठा राहणार बंद


दक्ष न्यूज: प्रतिनिधी

  • प्रभाग १७, १८, १९ आणि २० मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत

नाशिक : नाशिक रोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंड मधील गोदावरी जलकुंभ भरणारी पंपाच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. या पाइपलाइनीचे काम करण्यासाठी नाशिकरोड परिसरातील पाणी पुरवठा २१ जूनला बुधवारी सकाळी होणार नाही. सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्र 17- मधील कॅनोल रोड परिसर , नारायण बापूनगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर, प्रभाग क्र.18 मधील शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी, इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर, प्रभाग क्र.19 मधील गोरेवाडी, शास्त्री नगर, प्रभाग क्र.20- मधील पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर, बुधवारी दिनांक 21/06/2023 रोजी या प्रभागांमध्ये सकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही व सायंकाळचा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *