हिंदुसुर्य, मेवाडचा कूलभुषण, महान योद्धा शूरवीर महाराणा प्रताप


नाशिक: (करणसिंग रामसिंग पवार)

हिंदूंचा खरा वाली जाणता राजा महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म जेष्ठ शुध्द 3 शके 1462 (9 मे सन 1540) रोजी माता महाराणी सौ. जयवंतीचा उदरात पिताश्री महाराणा उदयसिंह संग्रामसिंह शिशोदिया यांच्या घराण्यात झाला. “ सोन्याचा दिवस ” म्हणून इतिहासात या दिवसाची नोंद झाली आहे. हिंदुस्तानचा अभिमान गौरव मातॄभक्ती देशभक्त हिंदु कुलभुषण महाराणा प्रतापसिंह अंत्यंत बुध्दीमानी कर्तव्यतत्पर “ प्राण जाये पर वचन ना जाये ” ही म्हण आपल्या जीवनात सार्थक करणारे वीर राजपूत राजे “हिंदु सुर्य ”म्हणून त्यांचा नावंलौकीक असलले महाप्रराक्रमी शुरवीर योध्दे महान राष्ट्र पुरूष होय.

सैनीकांची पारख‚ सैन्य संचालन‚ सैन्याच्या हालचाली निरनिराळ्या प्रकारच्या व्यूहरचना करणे‚ शत्रुची व्यूहरचना फोडून बाहेर येणे वगैरे युध्दकलेचे शिक्षण महाराणा प्रताप यांनी चांगल्या प्रकारे घेतले होते. ढाण्या वाघाची शिकार समोरा समोर तलवारी‚ भाला‚ बाणाने करीत असत. महाराणा प्रतापसिंह आपल्या मित्र सवंगडी व सहकारी बरोबर अंत्यंत जीव्हाळ्याने व प्रेमाने राहत त्यामुळे ते शेवटच्या क्षणापर्यतं एकनिष्ठ व प्रामाणिक राहीले. दिंनाक 28 फेब्रुवारी 1572 रोजी होळीच्या दिवशी गोगुंदा येथे महाराणा प्रतापसिंह प्रथम गादीवर विराजमान झाले. मेवाडच्या गादीवर महाराणा प्रतापसिंह बसल्यामुळे हिंदुचे नशीब उजळले. चित्तोड ही महाराणा सांगा उर्फ संग्रामसिंह यांची राजधानी मोगलाच्या ताब्यात होती. चित्तोड सोडवण्याचे स्वप्न महाराणा प्रतापसिंह यांनी उराशी बाळगले होते. मुसलमान बादशाह अकबर व महाराणा प्रतापसिंह याच्यातील संघर्ष जातीय होता असे म्हणता येणार नाही पंरतू महाराणा प्रतापसिंह आपल्या मातॄभुमीच्या रक्षणासाठी व धर्म रक्षणासाठी लढत होते तर अकबर सांम्राज्य विस्तारासाठी लढत होता.

दक्ष न्युजच्या वतीने जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

महाराणा प्रतापसिंह यांच्या नसानसात शौर्य आणि देशप्रेम ठासुन भरलेला होता “ राजपुतोंका लहू बहेगा तो सिर्फ मातॄभुमी के लिये ” ते स्वाभिमानी होते काही राजपूत राजे उदा. मानसिंग वगैरे यांनी अकबराचे सरदार होणे पसंत केले होते.

अकबराचा सरदार मानसिंग यांने महाराणा प्रतापसिंह यांच्याशी वाटाघाटी करून मार्ग काढणे पंसत केले परंतु देशभक्त महाराणा प्रतापसिंह यांनी अकबरा पुढे न झुकता युध्द करण्याचे ठरवीले. हेच युध्द इतिहासात हळदीघाटीचे युध्द म्हणून प्रसिध्द झालेले आहे. हे युध्द गोगुंदा व खमनारेचा मध्ये पहाडी घाटाचा बिकट रांगामध्ये हळदी घाट येथे झाले. मानसिंगाच्या सैन्यात 5 हजार घोडेस्वार‚ 3 हजार पायदळ हत्ती व तोफा होत्या. महाराणा प्रतापसिंहच्या सैन्यात 3 हजार घोडेस्वार‚ 2 हजार पायदळ व 100 हत्ती होते. शत्रुवर फेकण्यासाठी लहान मोठे दगड होते.

18 जून 1576 साली हळदी घाटाचे युध्द सुरू झाले. मानसिंहाच्या आघाडीच्या तूकडयांमध्ये जगन्नाथाच्या नैत्रॄत्वाखाली कडवे राजपूत होते तर महाराणा प्रतापसिंहच्या सैन्याचा आघाडीवर हाकीमसुराचा नैत्रॄत्वाखाली बलदंड मुसलमान पठाण होते. हा कीती विचित्र योगा योग होता युध्द रणकंदन सुरू झाले.

महाराणा प्रतापसिंह आपल्या घोडा चेतकवर स्वार होऊन मानसिंहाशी लढत होते. महाराणांनी भाला फेकला मानसिंहाचा हत्ती वाकला रणकंदन सुरू झाले. चेतकने मानसिंहावर उडी घेतली कंठस्थळावर पुढचे पाय ठेवले, हत्तीच्या सोडंला तलवार बांधलेली होती. त्यामुळे चेतकच्या मागच्या पायाला जखम झाली. राणा वेढला जातोय असे दिसताच हकीमशाहसुर आपल्या तूकडीसह महाराणा प्रतापसिंह यांना येऊन मिळाला. मानसिंहवर केलेला मोर्चा महाराणा प्रतापसिंहानी मागे वळवीला प्रतापसिंहाच्या लोकांनी महाराणा प्रतापसिंहांना रणधुमाळी पासुन दुर नेले. शालुबरेचा बीदा झाला या सरदाराने प्रतापांची राजचिन्हे स्वत: धारण केले व सर्व प्रमुख सरदाराचे मते महाराणांनी युध्दापासुन दुर जावे असे ठरविले.

हळदी घाटी मार्गे महाराणा पहाडातून निघाले. अत्यंत जखमी झालेला धनीनिष्ठ चेतक हळदी घाट ओलंडून सुरक्षित स्थळी महाराणांना घेवुन आला. आपल्या जीवाची पर्वा न करता धन्याला प्रामाणिकपणे संकटाबाहेर आणुन चेतक बलीया गावाजवळ गतप्राण झाला. येथेच चेतकचे अंत्यसंस्कार करुन त्याची समाधी बांधण्यात आली. त्यानंतर राजस्थान सरकारने येथे चेतकाचा पुतळा व स्मारक उभारले आहे. झाला सरदार ‚चेतक घोडा यांचे शौर्य अपूर्व आहे. यांच्या बलिदानानेच महाराणा वाचू शकले. या युध्दात मोगल सैेन्याला परत फिरावे लागले.

महाराणा प्रताप व अकबर यांच्यामध्ये 15 वर्ष युध्द चालले. परंतु अकबर मेवाडला जिंकू शकला नाही. प्रतापसिंहांना हरवू शकला नाही वा जिवंत ही पकडू शकला नाही किंवा ठार मारु शकला नाही. इतकेच नव्हे तर प्रतापसिंहांचे काही वाकडे करु शकला नाही. सन 1572 ते 1575 पर्यंत महाराणा प्रतापसिंहांना आपल्या अंगावरुन चिलखत‚ जिरेटोप काढून ठेवण्यास फुरसत मिळाली नव्हती. सन 1585 पासून ती मिळू लागली. महाराणांना 11 राण्या‚ 17 राजकुमार होते.

महाराणांना पोटाच्या आजाराने ग्रासले होते. तरीही महाराणांना मेवाडच्या स्वातंञ्याची काळजी हेच मोठे दुखणे होते. “ अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी मोगलांना शरण जाणार नाही ‚मेवाडचे स्वातंञ्य अबाधित राखेन ” असे युवराज अमरसिंहाने महाराणांसमोर श्री एकलिंगजीची शपथ घेतली. सर्व सामंतानी व सरदारानी महाराणा प्रतापसिंहानां वचन दिले की मेवाडच्या स्वातंञ्यासाठी आम्ही प्राणपणाला लावू. मेवाडला कोणीही अंकीत करणार नाही. यानंतर महाराणा प्रतापसिंहाचे मन शांत झाले.

बुधवार दि. 19 जानेवारी 1597 शके 1519 यादिवशी या महान झुंझार विराने धरती मातेच्या मांडीवर चिरनिद्रा घेतली. या वेळी राणाचे वय 57 वर्ष होते. या अवतारी राष्ट्रपुरूषाचा अंत्यसंस्कार बंडोली गावात एका डोंगरी नाल्याचा तीरावर करण्यात आला. महाराणा प्रतापसिंहाच्या निधनाची बातमी लाहोर येथे अकबराला कळल्यानंतर अकबर सुन्न व दु:खी झाला या वरून महाराणा प्रतापसिंहाची थोरवी कळते.
शेवटी असे म्हणावेसे वाटते‚

सुरज के तेज जैसा चमके जिसका भाल !

लालोमे लाल भारत माता का लाल !!

जिसने सुखको त्यागकर धर्म अपना मानकर !!!

करदीया बलिदान मातॄभुमिके नाम पर !!!!

वो है वो है शुरवीर महाराणा प्रतापसिंह !!!!!

  • केंद्र सरकारने महाराणा प्रतापसिंहच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा नांवाने शौर्य पुरस्कार लष्करी अधिकारी यांना दर वर्षी देण्यात यावे, तसेच हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज व महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेच्या चलनी नोटा चलनात आणाव्यात हीच अपेक्षा.

माहिती संकलन: रामसिंग भाऊ बावरी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *