पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या वाटेवर: डॉ. भामरे
दक्ष न्यूज: प्रतिनिधी
सटाणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ०९ वर्षांच्या कारकिर्दीत देशात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत माजी संरक्षण राज्यमंत्री, खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आज दि.१७ रोजी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेत नऊ वर्षात झालेल्या कामांची व योजनांची माहिती दिली.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ९.६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ११.७२ कोटी शौचालये बांधण्यात आले, मुद्रा योजने अंतर्गत २७.६ महिला लाभार्थ्यांना कर्ज तसेच सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत देण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत १०.७ कोटी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण आणि ४.५ कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले, मेडिकल मधील औषध स्वस्तदरात उपलब्ध व्हावे ह्यासाठी ९.३०० हून अधिक जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधे उपलब्ध करण्यात आले.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर आणि काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम सुरू आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले गेले आहे. कोविड काळात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाची सुरक्षा देखील मजबुत झाली आहे संघर्ष क्षेत्र सोडले तर इतर कुठेच दहशतवादी हल्ला झालेला नाही. हि देखील देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे खासदार डॉ भामरे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीधर कोठावदे, भाजपा जेष्ठ नेते रमेश देवरे, माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विलास बच्छाव, शेषराव पाटील, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, माजी नगराध्यक्ष सुनिल मोरे, भाजपा नगर परिषद प्रभारी लकी गिल, निलेश कचवे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नरेंद्र आहिरे, संचालक संजय सोनवणे, माजी चेअरमन भाऊसाहेब भामरे, संजय भामरे यांच्यासह आदी उपस्थित होते.