मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल तेजस्वी- उपाध्ये


 

दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नाशिक: मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे. ‘शासनव्यवस्थे’स ‘सुशासनव्यवस्थे’त बदलण्याचा पंतप्रधान मोदी यांचा ध्यास आहे. गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने आठशेहून अधिक योजना कार्यान्वित केल्या. यापैकी काही योजना अगोदरही अस्तित्वात होत्या. केंद्र सरकारने त्यांना नवा आकार दिला. दर चार दिवसागणिक एक नवी किंवा सुधारित योजना देशात साकारली आहे, आणि त्याचे लाभ सामान्य जनतेला मिळत आहेत. असे प्रतिपादन भाजप मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले .भारतीय जनता पार्टी कार्यालय वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

      या वेळी व्यासपीठावर  भाजप प्रदेश सह मुख्य  प्रवक्ते अजित चव्हाण, भाजप प्रदेश माध्यम विभाग प्रमुख  नवनाथ बन, नाशिक महानगर भाजप अध्यक्ष गिरीष पालवे , आमदार प्रा.देवयानी फरांदे , प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदेश प्रवक्ते व प्रदेश उद्योग आघाडी संयोजक  प्रदीप पेशकर, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, नाशिक शहर सरचिटणीस जगन पाटील , सिडको मंडळ २ अध्यक्ष अविनाश पाटील, सुजाता करजगिकर, ज्योती चव्हाणके आदी व्यासपीठावर उपस्थित होते

उपाध्ये यांनी बोलताना स्मार्ट सिटी, अमृत योजना, भारतमाला, सागरमाला, राष्ट्रीय महामार्ग विकास आदी अभिनव योजनांतून शाश्वत विकासाबरोबरच, विदेश नीतीचा एक नवा आदर्श मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रस्थापित केला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, भारत, जपान, अमेरिका त्रपक्षीय संवाद, उपखंडातील सुरक्षेसंबंधीची रोखठोक भूमिका, आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय मंचावर च निर्भयपणे मांडलेली भूमिका, आदी अनेक बाबींमुळे देशाला प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. असे प्रतिपादन केले. पत्रकार परिषदेच्या सुरवातीला राजमाता जिजाऊ  यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजमाता   जिजाऊन च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण व आमदार देवयानी फरांदे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *