नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २४ वा वर्धापनदिन उत्साहात
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक,दि.१० जून:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सत्तेच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून अनेक विधायक कामे केली. राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने महिला धोरण, मंडल आयोगाची अंमलबजावणी, शेतकरी कर्जमाफी यासारखे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. महाविकास आघाडीच्या कालवधीतही अनेक विकासाची कामे आपण केली. आज मात्र देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर व सर्वसमान्य नागरिक अडचणीत आला असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

नाशिक राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २४ वा वर्धापन दिन व रौप्य महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सरोज आहिरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार अपूर्व हिरे, विष्णूपंत म्हैसधूने,प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, मधुकर मौले, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, संजय खैरनार, समाधान जेजूरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, ऐश्वर्या गायकवाड, दिलीप नलावडे, सुरेश आव्हाड, धनंजय राहणे, मनिष रावल, जगदीश पवार, कविता कर्डक, समिना मेमन, सुषमा पगारे, बाळासाहेब गीते, सुरेख निमसे, मनोहर कोरडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.