शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली; ‘आश्चर्य’ अजित दादांना कोणतीच जबाबदारी नाही ?


  • सुप्रिया सुळे- प्रफुल्ल पटेल यांच्या कडे पक्षाचे नेतृत्व

दक्ष न्यूज: प्रतिनिधी

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यानंतर शरद पवार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. शरद पवार यांच्या या घोषणा म्हणजे धक्कातंत्राचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे.

शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली आहे. पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *