नाशिकमहाराष्ट्र

भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या – छगन भुजबळ


  • ओबीसींना आपले हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

दक्ष न्यूज: प्रतिनिधी

नागपूर :- देशात ज्या प्रमाणे एसी, एसटी ला निधी मिळतो त्याप्रमाणे ओबीसी ला मिळाला पाहिजे. ओबीसी जनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक राज्यात झाली तीच मागणी आमची पण आहे ती पूर्ण झालीच पाहिजे. त्यामुळे ओबीसींना आपले हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल विभागाच्या वतीने दोन दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सोहळा आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी गृह मंत्री अनिल देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहीते,राज्य उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ,ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके, दूनेश्वर पेठे ,राज राजापूरकर, अरविंद भाजीपाले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *