उद्धव ठाकरेंकडे काही मिळणार नाही, माझ्याकडे या आठवलेंची आंबेडकराना खुली ऑफर
दक्ष न्यूज प्रतिनिधी: भैय्यासाहेब कटारे
शिर्डी : येथे आरपीआयच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे शिर्डी येथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

या अधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे यांच्याकडे न जाता माझ्याकडे यावे सत्तेत वाटा मिळावा व समाजाच्या हितासाठी आपण एकत्रित यावे अशी खुली ऑफर यावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली.
सदर अधिवेशन ऐतिहासिक ठरले असून राज्यभरातून लाखोच्या संख्येने येथील कांदा मार्केट मैदानावर रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश मातेकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शीलाताई गांगुर्डे नाशिकचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, राज्य सचिव संतोष कटारे, विश्वनाथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले मान्यवरांचे समोचीत भाषणे झाले. शिर्डी लोकसभेत माझा अपप्रचार करून 2009 ला माझा पराभव केला मात्र राजकारणात हार जीत ही चालूच राहते त्यातून मी काय नाराज झालो नाही. मात्र शिर्डी व परिसरातील लोकांची माझे जिव्हाळ्याचे संबंध असून शिर्डी सर्वांगीण विकासाकरिता लोकांच्या आग्रा खातर मी पुन्हा 2024 ला शिर्डी मधून निवडणूक लढवणार असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.