आज पासून चलनात येणार हे नाणे
दक्ष न्यूज: करणसिंग बावरी
- 75 रुपयांचे नाणे आणि स्टॅम्पचे करण्यात येणार लोकार्पण
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज रविवारी (28 मे) संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाप्रसंगी 75 रुपयांचे नाणे आणि स्टॅम्पचे देखील लोकार्पण करण्यात येईल, असं अर्थ मंत्रालयाने नुकतीच एक नोटिफिकेशन जारी करत हे नाणे भारत सरकारच्या कोलकाता येथील टांकसाळीत तयार होणार असल्याचं सांगितलं आहे.
- कसे असणार हे नवीन नाणे ?
केंद्र सरकार 862 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी 75 रुपयांचे नाणे बाजारात आणणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहीतीनुसार, हे नाणे गोल असेल, ज्याचा व्यास 44 मिमी ठेवण्यात आला असून त्याच्या बाजूला 200 सिरेशन्स असतील. हे नाणे बनविण्यासाठी 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल आणि 5% झिंकपासून बनविले आहे.
तसेच या नवीन 75 रुपयांच्या नाण्याच्या एका बाजूला अशोकस्तंभ असणार आहे. या नाण्याच्या खालील बाजूस सत्यमेव जयते लिहिलेलं असणार आहे, तर डावीकडे देवनागरीत भारत आणि उजवीकडे इंग्रजीत India असं लिहिलेलं असणार आहे. नव्या नाण्यावर रुपयाचे चिन्हही असणार आहे आणि सिंहांच्या खाली 75 रुपये असं लिहिलेलं असेल, तर नाण्याच्या दुस-या बाजूला संसद परिसराचे चित्र असेल. छायाचित्राच्या वर देवनागरीत ‘संसद संकुल’ आणि खाली इंग्रजीत ‘पार्लियामेंट कॉम्प्लेक्स’ असं लिहिलेलं असणार आहे.