महाराणा प्रताप जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला


नाशिक: प्रतिनिधी

महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंती निमित्त ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दशकपूर्ती वर्षात पदार्पण करणारी ही व्याख्यानमाला ११ ते १३ जूनदरम्यान सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.

पहिल्या व्याख्यानमालेचे पुष्प माजी सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त डॉ. बालसिंग राजपूत ‘सायबर क्राइम आणि ज्ञान अज्ञान’ या विषयावर गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल असतील. १२ जून रोजीमुक्तादाभोलकर विवेकी पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दीप्ती राऊत असतील. तर, १३ जून रोजी कारगिल योद्धा नायक दीपचंद हे ‘मेरा भारत ‘महान’ या विषयावर बोलणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य तानसेन जगताप असणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराणा प्रताप जयंती व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रा. संजीव पवार, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मा भीमसिंग साळुंखे, तसेच मिलिंद राजपूत, डी. आर. पाटील, जयदीप राजपूत, भवानसिंग सोलंकी, महेंद्र राजपूत, सुनील पवार, किरण खाबिया, नितीन गिरासे, जयदीप पवार, दिनेश पाटील, राजेंद्र चौहान, जयप्रकाश गिरासे, सुनील पवार, रामसिंग बावरी, वीरेंद्रसिंग टिळे, सुनील परदेशी, बबलूसिंग परदेशी आदींनी केले आहे.

  • ऑनलाइन व्याख्यानमालेसाठी लिंक

https://us05web.zoom.us/j/7202243926?pwd=TDJPRjVJcWlPdG9zSDllZ3ZwZ0xOdz09


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *