आयपीएलचा थरार पुन्हा रंगणार 19 सप्टेंबर पासून तर दसऱ्याला होणार फायनल


नवी दिल्ली : प्रतिनिधी

आयपीएलबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचा सुपर धमाका आता दसऱ्याला होणार असल्याचे समजतंय. आयपीएलचे दुसरे पर्व आता १९ सप्टेंबरला सुरु होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्याचबरोबर आयपीएलची फायनल यावेळी १५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरला दसरा असून या दिवशीच आयपीएलचा सुपर धमाका होणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले की, बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये आयपीएलबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सकारात्मक होत आहे. त्यामुळे आयपीएलचे दुसरे पर्व यशस्वी होऊ शकेल, असा विश्वास बीसीसीायला आहे.

आयपीएल ही युएईमध्ये होणार, असे बीसीसीायने यापूर्वीच सांगितले होते. पण आयपीएल कधीपासून सुरु होणार, हे अजूपर्यंत कोणालाच माहिती नव्हते. पण आता आयपीएल कधीपासून सुरु होणार आणि कधई संपणार, हे सर्वांना समजले आहे. पण याबाबतची अधिकृत घोषणा मात्र बीसीसीआयने केलेली नाही.

अमिराती क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला आयपीएल आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या आठवड्यात ही मंजूरी मिळालेली आहे. कारण आयपीएलचे ३१ सामने आता शिल्लक आहेत आणि त्यासाठी बीसीसीआय २५ दिवसांचा कालावधी पाहत होते. त्यांना आता हा कालावधी मिळाला असून अमिराती क्रिकेट मंडळाकडूनही आता त्यांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या प्रक्रियेला बीसीसीआय सुरुवात करणार आहे. त्यासाठी खेळाडूंना कसं आणि कुठे बोलवायचं आणि त्यांनी व्यवस्था कशी करायची, यावर बीसीसीआय आता विचार करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *