भगूर देवळाली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कांडेकर तर उपाध्यक्षपदी सोनवणे
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : देवळाली कॅम्प भगुर, देवळाली कॅम्प परिसर पत्रकार संघाची बैठक डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात मावळत्या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रविण आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सन २०२३-२४ साठी नूतन वार्षिक कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. अध्यक्ष सुभाष कांडेकर, उपाध्यक्ष भास्कर सोनवणे, कार्याध्यक्ष प्रशांत धिवंदे, सचिव प्रमोद रहाणे, सहसचिव गोकुळ लोखंडे, खजिनदार संजय निकम, तर मार्गदर्शक म्हणून वाल्मिक शिरसाट, सुधाकर गोडसे, विलास भालेराव यांचा नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारी सदस्य म्हणून प्रविण आडके, गौतम पगारे, भरत चव्हाण, अशोक गवळी, दिपक कणसे, महेश गायकवाड, भास्कर साळवे, भैयासाहेब कटारे, शौकत काझी, सादिकभाई कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह सर्व वृत्त्तपत्र विक्रेते यांचा समावेश करण्यात आला आहे. नूतन पदाधिकारी निवडीचे अनेक मान्यवरांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
सदर बैठकीत संघाचे आगामी उपक्रम, संकल्पना, दारणा गौरव पुरस्कार वितरण सोहोळा आयोजन यांसह इतर विषयावर सविस्तर चर्चा झाली. प्रारंभी दिवंगत पत्रकार प्रकाश टाकेकर, रत्नकांत गोविंद यांना संघाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे, मावळते अध्यक्ष प्रविण आडके, ज्येष्ठ पत्रकार वाल्मिक शिरसाट, विलास भालेराव, प्रमोद रहाणे, भरत चव्हाण, भास्कर साळवे, अशोक गवळी यांची समयोचीत भाषणे झालीत. नव निर्वाचित अध्यक्ष सुभाष कांडेकर यांनी सर्वांना विश्वासात आणि सोबत घेऊन पदाची जबाबदारी समर्थपणे पेलून यशस्वी वाटचाल करू अशी ग्वाही दिली. तसेच सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.